पवारांची साथ सोडणाऱ्या पिचड पिता-पुत्राचा आमदारकी, ग्रामपंचायत पासून आता साखर कारखाना निवडणुकीतही पराभव

Madhukar Pichad | अकोलेतील अगस्ती सहकारी साखर कारखाना २१ संचालक निवडीसाठी काल रविवारी मतदान होत आहे. ९ मतदान केंद्रांवर २३ बुथवर २२५ कर्मचारी मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती आहे. माजी मंत्री मधुकर पिचड विरोधात महाविकास आघाडी एकत्र आल्याने निवडणुकीची रंगत वाढली होती.
माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ व आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, माकप नेते डॉ. अजित नवले, कम्युनिस्ट नेते कॉ. कारभारी उगले, आर पी आयचे नेते विजयराव वाकचौरे आदींच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळात सरळ चुरशीची लढत होती.
दरम्यान, अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरील पिचड यांची सत्ता गेली असून विरोधकांचा दणदणीत विजय झाला आहे.
राजकीय पत संपूष्टात :
आधी आमदारकी, मग ग्रामपंचायत निवडणूक आणि आता साखर कारखाना निवडणुकीत मधुकर पिचड गटाचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे पिचड यांनी साखर कारखान्यावरील तब्बल 28 वर्षांपासून असलेली सत्ता गमावली आहे
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Agasti Sakhar Karkhana election Pichad family lost 28 years of power check details 26 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं