नवनीत राणांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड | सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली

मुंबई, १८ जून | अमरावतीच्या भाजप समर्थक खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने २ लाखांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. खासदार नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती मिळतेय.
अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना उच्च न्यायालयानं 2 लाखांचा दंडदेखील सुनावला आहे. नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Amaravati MP Navneet Rana review petition in the Supreme Court news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं