हडपसर: जेटलींचा श्रद्धांजली कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचा फोटो रस्त्यावर पडून

पुणे : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याचे अनेक कार्यक्रम देशभर भारतीय जनता पक्षाने आयोजित केले होते. त्यावेळी अनेक ठिकाणी सेल्फी तसेच पदाधिकारी आणि भाजप मंत्र्यांनी त्याच ठिकाणी हास्य विनोदाची जत्रा भरवल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी देखील अनेकांनी भाजपच्या त्या वागणुकीवर संताप व्यक्त केला होता.
मात्र असेच प्रकार सध्या भाजपमधील इतर वरिष्ठ नेत्यांच्या निधनानंतर देखील अनुभवण्यास मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आजारामुळे निधन झाले. त्यानंतर दिल्लीत त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेकांनी हजेरी लावली होती आणि त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले होते. मात्र त्याचवेळी राज्यात देखील अनेक मतदासंघात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी कार्यक्रम आयोजित केले होते. तसाच कार्यक्रम पुण्यातील हडपसर विधानसभा मतदासंघात आयोजित करण्यात आला होता.
यावेळीच हडपसर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामाचा शुभारंभ राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी पुण्यात आले होते. दरम्यान याच उद्घाटन समारंभाआधी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भाजपतर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमामध्ये अरुण जेटलींच्या फोटोला हार घालून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. परंतु या कार्यक्रमानंतर मागील २ दिवसापासुन अरुण जेटलींचा फोटो बाजूच्याच रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात होता आणि तो तिथेच पडून होता.
दरम्यान, उद्घाटन कार्यक्रमाआधी मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरुण जेटली यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मंडळीची दमदार भाषणे झाली. हा कार्यक्रम साधारण २ तास चालला.
कार्यक्रम संपल्यानंतर तेथील मांडव आणि इतर सर्व साहित्य काढून घेण्यात आले. पण ज्या व्यासपीठावरुन अरुण जेटलींना नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली त्या जेटलींच्या फोटोकडे साधे कोणाचे लक्ष देखील गेले नाही आणि तो फोटो रस्त्याच्या कडेला फेकून आयोजक देखील निघून गेले होते आणि तोच फोटो मागील दोन दिवस रस्त्याच्या कडेला पडून होता, याकडे कोणाचे लक्ष नसल्याने समाज माध्यमांवर संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं