बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण | अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा

मुंबई, २३ जानेवारी: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती साजरी होत आहे. आज बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावर होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंती निमित्त होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपिठावर उपस्थित होते.
राज्याच्या जडणघडणीचा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान मोठं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज त्यांच्या 95 व्या जयंतीला करण्यात आलं.
साहेब ?? pic.twitter.com/5BitF3II5S
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) January 23, 2021
हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.
News English Summary: Shiv Sena chief Balasaheb Thackeray’s 95th birth anniversary is being celebrated today. Today, the statue of Balasaheb will be unveiled. Chief Minister Uddhav Thackeray, NCP president Sharad Pawar, MNS chief Raj Thackeray and Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis were present on the same platform at a function marking the 95th birth anniversary of Balasaheb Thackeray.
News English Title: Balasaheb Thackeray statue unveiled program Chief minister Uddhav Thackeray news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं