'हा' खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा: शिवसैनिकांचा संताप

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या निवडणुकींमध्ये राज्यात अनेक ठिकाणी फाटाफुटीचं राजकारण झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली. परंतु काही ठिकाणी शिवसेनेतल्या नाराजांनी भारतीय जनता पक्षाला साथ देत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला अशा नेत्यांविरुद्ध आता शिवसैनिकांनी एल्गार पुकारलाय. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला साथ देणारे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पोष्टर्स लावले आहेत. त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय.
सोलापुरातील मॅकनिक चौकात तानाजी सावंत यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आला आहे. हा बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे. तानाजी सावंत यांचा उल्लेख या बॅनरमध्ये खेकडा असा करण्यात आला आहे. आता तानाजी सावंत यावर काही भाष्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अलीकडेच तानाजी सावंत यांच्या गटाने भारतीय जनता पक्षाला साथ दिल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तोंडघशी पडावे लागले. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या भारतीय जनता पक्ष समर्थक सदस्या अस्मिता कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी सेनेच्या बंडखोर गटाचे धनंजय सावंत यांची वर्णी लागली. यामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Web Title: Banner against rebel shivsena MLA Tanaji Sawant in Solapur by shivsena workers.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं