बारामतीत भाजप मातीत; सुप्रिया सुळे विजयी तर कांचल कुल यांचा पराभव

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघावर विजय प्राप्त करण्याचं भाजप नेत्यांचं स्वप्न भंगलं असून या मतदारसंघात केवळ पवार कुटुंबीयच राज्य करतात हे पुन्हा सिद्ध झालं आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी मोठं मोठ्या रणनीती आखात होते आणि त्यावर लक्ष देखील ठेऊन होते.
स्वतः महसूल मंत्री चंद्र्कांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस आणि विशेष म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येथे अनेक सभा घेऊन गेले. मात्र भाजपच्या नेत्यांची ही सर्व स्वप्न केवळ स्वप्नच राहिली आहेत असं निकालानंतर समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते या विषयावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना घेरण्याची शक्यता आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांनी लाखभर मतांची आघाडी घेतली असून भाजपच्या उमेदवार कांचल कुल पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचं नैतृत्व पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेच करतील यांवर शिक्कामोर्तब झालं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं