विधानसभा निवडणूकीआधी सरकार धनगर समाजावर खुश!

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना आता राज्य सरकार सर्व समाजाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास विलंब होत असताना तसंच धनगर समाजाचा रोष टाळण्यासाठी राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती मिळणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याआधी मराठा समाजाला देखील आरक्षण देऊन खूश केलं आहे. आता राज्य सरकारने आदिवासी समाजाला मिळणाऱ्या सवलती धनगर समाजाला देखील मिळतील असा निर्णय घेऊन धनगर समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
आज राज्य मंत्रीमंडळाने आदिवासी विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवणार आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत १३ योजना सुरु करण्यात येणार आहेत.
१) भटक्या जमाती क या प्रवर्गासाठी भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त तसंच मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे.
२) वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे.
३) भटक्या जमाती-क या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देणे.
४) भटक्या जमाती क प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरं बांधून देणे.
५) भटक्य जमाती क या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी नसलेल्या योजना राबिवण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना.
६) राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे.
७) केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत भटक्या जमाती क या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे.
८) भटक्या जमाती क प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसळ्यात चराईकरता जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांसाठी चराई अनुदान देणे.
९) भटक्या जमाती क प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण मिळणार.
१०) भटक्या जमाती क प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक सवलती लागू करणे.
११) भटक्या जमाती क प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.
१२) ग्रामीण भागातील कुक्कुटपालन संकल्पेनर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील जमातीसाठी ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी आणि संगोपनासाठी अर्थसहाय्य देणे.
१३) नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि अमरावती या महसुली विभागांच्या मुख्यलयाच्या ठिकाणी भटक्या जमाती क प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं