सत्ताधाऱ्यांच्या भाषणातून बेरोजगारी, मंदी, महागाई आणि शेतकरी आत्महत्या मुद्दे गायब

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पहिली सभा झाली आहे. जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत मोदींच्या पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली. तर यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्यांना निवडून द्या असं आवाहनही मोदींनी यावेळी जनतेला केलं. दरम्यान, याहीवेळेस मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
जम्मू काश्मीरमधील लोकांच्या विरुद्ध भावना काँग्रेस-राष्ट्रवादीची दिसून येते. शेजारील राष्ट्रांना मदत होईल असे वक्तव्य करतात. त्यामुळे तुमच्यात हिंमत असेल तर आगामी निवडणुकीत विरोधकांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० परत आणू असं घोषणापत्रात देणार का? उगाच खोटे अश्रू काढू नका असं आव्हान नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, जळगावात अभूतपूर्व सभा झाली. पुढील ५ वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार यावं यासाठी मी जळगावात आलो आहे. तुम्ही जो विश्वास भारतीय जनता पक्षावर, एनडीएवर दाखविला त्याचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे. चार महिन्यांपूर्वी तुम्ही समर्थ, सशक्त भारताच्या निर्माणासाठी मतदान केलं होतं. जगात भारताला स्थान मिळावं यासाठी तुम्ही मतदान केलं. नव्या भारताचा नवा जोश जगाला दिसू लागला आहे. तुम्हाला हे दिसतंय ना,असं जनतेला विचारले. पूर्वी असं चित्र पाहायला मिळालं होतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित लोकांना विचारला. केवळ मोदी मूळे हे होत नाही, १३० कोटी भारतीय जनतेने केलेल्या सहकार्य यामुळे शक्य झाले.
असं असलं तरी संपूर्ण भाषणात मोदींनी बेरोजगारी, ढसाळणारी अर्थव्यवस्था, शेतकरी आत्महत्या आणि महिलांसंबंधित वाढत्या गुन्हेगारी अशा गंभीर विषयांना हात घातलाच नाही. संपूर्ण भाषण जम्मू काश्मीर, कलम ३७० आणि इतर पाकिस्तान संबंधित भावनिक मुद्दे मांडत मतदाराला पुन्हा भावनिक भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सरकार म्हणून खरंच बेरोजगारी, ढसाळणारी अर्थव्यवस्था, शेतकरी आत्महत्या आणि महिलांसंबंधित वाढत्या गुन्हेगारी अशा गंभीर विषयांबद्दल काहीच देणंघेणं नसल्याचं दिसत आहे.
अगदी बीडमधील अमित शहा यांच्या भाषणापासून केवळ भावनिक मुद्दे पुढे रेटले जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. तरुणांच्या, सामान्य मतदारांच्या, महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींनी कोणती गंध नसल्याचं दिसत असून , आज मोदींच्या भाषणात देखील स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळे सामान्य मतदार आता काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
- मी जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे
- फडणवीसांच्या नेतृत्वाला मद द्या
- जगभरात भारताचा गौरव होत आहे
- 4 महिन्यांपूर्वी दिलेल्या मताधिक्याबद्दल आभार
- संपूर्ण जगभरात भारताच्या लोकशाहीचा गौरव
- जनादेशामुळे भारताचा आवाज जगभरात ओळखला जातो.
- स्त्रीशक्तीचा जागर जगाने मानला
- 70 वर्षानंतर काश्मीरमधील नागरिकांना स्वातंत्र्य
- सीमेपलीकडे होणारा दहशवाद संपवला
- मोदींकडून कलम 370 आणि काश्मीरचा उल्लेख
- काश्मीर भारताचं मस्तक आहे.
- गेली 5 वर्ष जनतेचा युतीवर विश्वास आहे
- कलम 370 वर विरोधकांची भूमिका संशयास्पद
- हिंमत असेल तर घोषणापत्रात कलम 370बद्दल नमुद करा, विरोधकांना आव्हाहन
- मुल्सीम महिलांना मोठा दिलासा दिला
- तीन तलाक कायदा रद्द केला
- शरद पवारांवर मोदींची घणाघाती टीका
- शरद पवारांच्या व्हायरल व्हिडिओवर नरेंद्र मोदींची टीका
- काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जनतेची दिशाभूल
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं