भाजपच्या चौथ्या यादीत खडसे, तावडे, प्रकाश मेहता आणि राज पुरोहित यांचा पत्ता कट

मुंबई: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपनं आपली चौथी यादी जाहीर केली आहे. वेटिंगवर असलेल्या दिग्गजांपैकी भाजपनं केवळ एकनाथ खडसे यांना दिलासा दिला आहे. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, माजी मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यासह कुलाबा आमदार राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
तत्पूर्वी भाजपानं १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. पहिल्या यादीनंतर भाजपाने १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यानंतर ४ उमेदवारांची तिसरी यादी भाजपाने जाहीर केली असून, आता सात जणांची चौथी यादीही प्रसिद्ध केली आहे. भाजपानं पहिल्या यादीतूनच मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अतुल भोसले दक्षिण कराडमधून निवडणूक लढणार आहेत. भाजपाने विद्यमान ११ उमेदवारांच्या आमदारकीचे तिकीट कापले, तसेच ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे.
बोरीवलीतून सुनील राणे, काटोलमधून चरण सिंग ठाकूर, नाशिक पूर्वमधून बाळासाहेब सानप यांचा पत्ता कट करण्यात आला असून राहुल ढिकले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर तुमसरमधून प्रदिप पडोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नावदेखील चौथ्या यादीत नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं