मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही जागा पुरणार नाही, त्यासाठी वेगळी जागा लागेल - पंकजा मुंडे

मुंबई, १३ जुलै | पंकजा मुंडेंनी मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच मंत्रिपदासाठी आपण राजीनामा देणार नाही असे स्पष्ट केले. यासोबतच सर्वांचे राजीनामे नामंजूर करत असल्याची घोषणा केली. यानंतर आपल्या सर्व समर्थक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
मी लालची नाही, मंत्रिपदासाठी राजीनामा देणार नाही:
भाजपचे दिवंगत नेते आणि आपले वडील गोपिनाथ मुंडे यांनी मला राजकारणात आणले ते आमदार किंवा मंत्री होण्यासाठी आणलेले नव्हते. त्यांनी सामान्य माणसाच्या हक्कासाठी आपल्या माणसांसाठी युद्ध केले होते. त्याच युद्धात सामान्य माणसांना न्याय देता यावा म्हणून मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणले होते.
दबावतंत्राला जागा पुरणार नाही:
यावेळी पंकजा मुंडे यांनी दबावतंत्र करत नसल्याचं स्पष्ट केलं. मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही ती जागा नाही. ही जागा पुरणार नाही. त्यासाठी वेगळी जागा लागेल, असं पंकजा म्हणाल्या.
मला राजकारणात आणताना मुंडे साहेबांनी भव्य विचार समोर ठेवला होता. माझ्या राजकारणाचा पाया फक्त मला मंत्री करा म्हणून नाहीच. मला मंत्री करा, माझ्या नवऱ्याला करा, माझ्या बहिणीला मंत्री करा असे मी म्हणणार का? आणि माझे कुटुंब माझी बहीणच आहे का? तुम्ही माझे कुटुंब आहात. माझे कार्यकर्ते माझे कुटुंब आहेत. त्यांचे मी खूप-खूप आभार मानते. मला सत्तेची लालच नाही. मी लालची नाही. त्यामुळे मंत्रिपदासाठी मी राजीनामा देईल असे तुम्हाला वाटते का? असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
जगाला गोपिनाथ मुंडे विसरू देणार नाही:
यावेळी बोलताना त्यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यविधीची आठवण काढली. “अनेक जण बोलतात की मी वडिलांचे नाव घेत असते. पण, मी या जगाला गोपीनाथ मुंडे हे नाव विसरू देणार नाही. तुम्हाला गोपीनाथ मुंडे यांचा अंत्यविधी आठवत असेल. त्यावेळी सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात शंका होत्या. आक्रोष होता. कित्येकांनी मुंडन केले होते. अंत्यविधीसाठी गेले असताना मलाही धक्के लागले. पण, त्यावेळी मी साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या मनातील साहेबांविषयीचे प्रेम पाहिले. त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा पाहिली. ते फक्त माझे नव्हे, तर त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी वडील होते.
माझे भांडण नियतीशी:
तुम्ही सर्वांनी माझी संघर्षयात्रा पाहिली, त्यावेळी सुद्धा मी काय म्हटले होते तु्हाला आठवत असेल. माझे भांडण केवळ नियतीशी आहे असे मी म्हणाले होते. माध्यमांनी जरा तपासून पाहावे माझे त्यावेळी केलेले भाषण, मी हेच म्हटले होते. मुंडे साहेबांना, एका सामान्य माणसाला सत्ता मिळाली, मंत्रिपद मिळाले ते नियतीने सामान्य काढून घेतले. मी ते नियतीशी भांडून घेणार आहे. मी म्हटले नव्हते की मी मुंडेंची वारसदार आहे किंवा त्यांची मुलगी आहे. भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असे मला वाटले होते, मुंडे साहेबांना वाटले होते. मी तर स्वतः मी मंत्रिपद नाकारले. त्यावेळी माझे अस्तित्व पणाला लागले होते. आपल्याकडे काही नाही असे वाटले होते. मी आधी जे मंत्रिपद नाकारले त्या मंत्रिपदासाठी मी राजीनामा देणार आहे असे तुम्हाला वाटते का?
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BJP leader Pankaja Munde addressed to her supporter in Mumbai office news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं