मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांवर थेट निष्ठावान नसल्याचे ठपके मारण्यास सुरुवात | पंकजांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली

बीड, ११ जुलै | भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्यानं मुंडे समर्थक चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. बीडमध्ये अनेक मुंडे समर्थकांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत आपली उघड नाराजी व्यक्त केलीय. यानंतर कुठलीही नाराजी नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर थेट निष्ठावान नसल्याचे ठपके मारण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे वाद अजून पेटणार असल्याचं दिसतंय.
भारतीय जनता पक्षाचे जे पक्षांतर्गत निर्णय होतात ते पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून होतात. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांचा समावेश झालाय तो पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून झालाय. अशावेळी व्यक्तीला महत्त्व न देता पक्षाला महत्त्व द्यायला हवा. पक्षाने घेतलेला निर्णय योग्य आणि पक्ष हिताचा आहे असंच भाजपचे निष्ठावान समजतात. त्यामुळे राजीनामे देणार पदाधिकारी भाजपचे निष्ठावान नाहीत असं मला वाटतं. केवळ प्रीतम मुंडे यांना पद दिलं नाही म्हणून राजीनामे देणं योग्य नाही,” असं गणेश हाके यांनी सांगितलं.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांनी येत्या मंगळवारी मुंबईत या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली. वरळी येथील कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंकजा मुंडे आपल्या समर्थकांची समजूत काढणार की काही वेगळाच निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील भाजपच्या 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे पंकजा मुंडे रविवारी सकाळीच दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. दिल्लीत त्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BJP leader Pankaja Munde call important meeting of supporters in Mumbai news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं