मोदींनी सुद्धा पंकजांना राष्ट्रीय मुद्यांच्या बहाण्याने सुनावले | वेगळा निर्णय घेण्याची शक्यता बळावली

मुंबई, २२ जुलै | बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बीड मध्ये भाजपच्या विरोधात मोठा आक्रोश उमटत असताना दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात गोपिनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांचा विसर मोदी सरकारला पडल्याचे पहायला मिळाल्याने अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा अध्यक्षांकडे सोपविले असून, जिल्हाध्यक्ष देखील पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला. याचमुळे आता मुंडे समर्थक आक्रमक झाले असून, उद्या शेकडो कार्यकर्ते पंकजा भेटून वेगळा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. पंकजा मुंडे सध्या दिल्लीत असून, प्रितम मुंडे यांच्या भेटीगाठी कार्यकर्त्यांनी सुरु केल्या आहेत. तसेच उद्या पंकजा मुंडे दिल्लीतून आल्यानंतर हे कार्यकर्ते त्यांची भेट घेऊन मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर त्यांच्या समोर तीन पर्याय असणार आहेत. पहिला पर्याय हा शिवसेना दुसरा पर्याय काँग्रेस आणि तिसरा पर्याय म्हणजे स्वतंत्र पक्षाची स्थापना.
आतापर्यंत ७७ पदाधिकाऱ्यानी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे दिले आहेत:
गेली ४ दिवसांपासून बीड जिल्ह्यात राजीनाम्याच सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजीचे सूर असून आणखीन राजीनामे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा आशयाचं पत्र भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिलं आहे. आतापर्यंत ७७ पदाधिकाऱ्यानी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे दिले आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी देखील आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत
पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष मस्के हे मुंबईकडे रवाना झाले:
दरम्यान, ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष मस्के हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन ते या राजीनाम्यावर चर्चा करणार आहेत. या राजीनामा सत्रावर भाजप प्रदेश कार्यकारिणी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या राजीनामा सत्रात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या जयश्री मस्के यांचाही समावेश आहे. त्यामुळे राजेंद्र मस्के यांच्याही निर्णयाकडे लक्ष वेधले आहे.
मोदींनी सुद्धा राष्ट्रीय मुद्यांवरून सुनावले:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक घेतली. यात ११ सचिवांच्या सोशल मीडियाचा रिपोर्ट पंतप्रधान मोदींच्या हातात होता. यात २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले. कोणत्या सचिवांनी राष्ट्रीय मुद्द्यावरून मतप्रदर्शन केले याची माहिती पंतप्रधानांकडे होती.
पकंजा मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीत पकंजा तुम्ही जास्त बोलता, लोकल मुद्द्यांवर खूप बोलता पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत. लोकलपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांकडे जास्त लक्ष द्या असा सल्ला मोदींनी पंकजा मुंडेंना दिला. झी २४ तासने ही बातमी दिली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BJP leader Pankaja Munde may take big decision tomorrow after Modi meet news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं