राजकीय पोळी भाजण्यासाठी मेटेंच संतापजनक वक्तव्य | म्हणाले, नक्षलवाद्यांना कळालं ते सरकारला का कळत नाही?

बीड , १३ जून | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा एक पत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा दिला आहे. भाकपा माओवादी कमिटी सचिव सह्याद्रीने हे पत्रक काढले आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
मात्र, हे पत्रक खरंच नक्षलवाद्यांकडून जारी करण्यात आले आहे का, याबाबत अद्याप साशंकता आहे. हे पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांची असलेली दहशत पाहता खोटे पत्रक काढण्याची हिंमत कोणीही करणार नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, नक्षलवाद्यांना अचानक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात रस का वाटू लागला आहे, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.
मात्र संबंधित पत्रक हे आपल्या राजकीय फायद्याचं आहे असं निदर्शनास येताच भाजपाचे विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांनी त्याच समर्थन करताना एक संतापजनक वक्तव्य केलं आहे. नक्षलवाद्यांच्या पत्रकावर विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे नक्षलवाद्यांना कळलं ते सरकारला का कळत नाही. मराठा समाजाची दुर्दैवी अवस्था झालीय हे नक्षलवाद्यांना कळलं आहे. ते सरकारला कधी कळणार, असा प्रश्न विनायक मेटे यांनी उपस्थित केला.
News Title: BJP leader Vinayak Mete made controversial statement on Naxals issued in Gadchiroli news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं