मुंबई महानगरपालिकेच्या 132 अधिकाऱ्यांच्या बढतीचा प्रस्ताव शिवसेनेने का अडवला? - आशिष शेलारांचा प्रश्न

मुंबई, १३ ऑगस्ट | भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलारांनी शिवसेनेला सुनावलं आहे. मुंबई महापालिकेतील एससी, एसटीच्या 132 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला घेरलं आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या आहेत? मंत्रालयातली बदल्यांप्रमाणे महापालिकेतही वसुली केली जात आ हे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
मंजुरीसाठी विलंब का करण्यात येतोय?
आशिष शेलारांनी ट्विट करत शिवसेनेला जाब विचारला आहे. “मुंबई महापालिकेतील अनुसूचित जाती, जमातीसह आरक्षणांच्या रिक्त पदांवर महापालिकेत सेवेत असलेल्या 132 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला. पण 4 सर्वसाधारण सभा घेऊनही सत्ताधारी शिवसेनेकडून या प्रस्तावाला मंजुरीसाठी विलंब का करण्यात येतोय?, असा सवाल शेलार यांनी केला आहे.
चिटणीस पदावर शुभांगी “सावंत” यांना डावलून संगिता “शर्मा” यांना बढती देण्यात आली आहे. आता 132 मराठी अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना पुन्हा अडवणूक करण्यात आली आहे. मंत्रालयातील बदल्यांप्रमाणे पालिकेत पण वसुली? मुंबईकर हो, हे पहा… अवतार मराठी माणसाच्या कैवाऱ्यांचे(?), मराठी अधिकाऱ्यांकडून वसुली करणाऱ्यांचे!”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मुंबई महापालिकेतील अनुसूचित जाती, जमातीसह आरक्षणांच्या रिक्त पदांवर महापालिकेत सेवेत असलेल्या 132 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला.
पण 4 सर्वसाधारण सभा घेऊनही सत्ताधारी शिवसेनेकडून या प्रस्तावाला मंजुरीसाठी विलंब का करण्यात येतोय?
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 13, 2021
◆ चिटणीस पदावर शुभांगी “सावंत” यांना डावलून संगिता “शर्मा” यांना बढती.
◆आता 132 मराठी अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना पुन्हा अडवणूक
◆मंत्रालयातील बदल्यांप्रमाणे पालिकेत पण वसुली?
मुंबईकर हो, हे पहा..
अवतार मराठी माणसाच्या कैवाऱ्यांचे(?)
मराठी अधिकाऱ्यांकडून वसुली करणाऱ्यांचे!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 13, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BJP MLA Ashish Shelar question to Shivsena over BMC news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं