पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहा: भाजप आ. जयकुमार रावल

धुळे: राज्यात युतीचे सरकार स्थापन होण्याआधीच दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील नेते एकमेकावर दबावतंत्र अवलंबत आहेत. दरम्यान पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार व्हा, असं खळबळजनक वक्तव्य पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. धुळे शहरात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. धुळे जिल्ह्यातल्या पाच मतदारसंघांचा आढावा रावल यांनी घेतला त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. सरकार स्थापन न झाल्यास निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश रावल यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिले असले तरी भारतीय जनता पक्ष-सेनेमध्ये सत्तेचा तिढा सुटता सुटत नाही आहे. एका बाजुने सेना आणि आघाडीचे नेते भूमिका मांडत असताना भारतीय जनता पक्षाने मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पर्यटन विकास त्री जयकुमार रावळ यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीची भाषा करत शिवसेनेच्या नकारघंटेला उत्तर दिले आहे. जयकुमार रावळ यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहे. शिवसेनेच्या ताठर भूमिकेला भाजपचे उत्तर देताना या निवडणुकीत थोड्या फरकाने हरलेल्या सर्व जागा जिंकणार असल्याचे रावळ यांनी वक्तव्य केले आहे.
त्यांनी धुळ्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत रावल यांनी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, काही जागा थोड्या कमी फरकाने हरल्या आहेत. या सर्व जागा पुन्हा जिंकू असा निर्धार करा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. शिवसेनेची ताठर भूमिका कायम राहिल्यास राज्यात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघ आहे. या पाचपैकी ४ जागांवर भारतीय जनता पक्षाने निवडणुका लढविल्या आहेत. यात धुळे ग्रामीण, साक्री येथील जागा भारतीय जनता पक्ष कमी फरकाने पराभूत झाली आहे. जिल्ह्यात पाचही जागा लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. निवडणुका पुन्हा झाल्यातर आमची लढण्याची तयारीही आहे असं जयकुमार रावल यांनी सांगितले. तसेच या निवडणुकीत मोठे यश मिळवून राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार आहोत असं बैठकीत सांगण्यात आलं.
दरम्यान, राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमावारी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची ते भेट घेणार असून राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कसा सोडवता येईल याबद्दल चर्चा करणार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं