संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद? - भाजप आ. प्रसाद लाड

मुंबई: उदयनराजेंना शिवरायांचे वंशज आहेत का असे विचारणारे शिवसेना नेते संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद?, असा जळजळीत सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. हिंदुत्वाचा अपमान तर केलातच, आता शिवरायांच्या वंशजांचा सुद्धा अपमान करत आहात. मात्र शिवरायांच्या वंशजांचा अपमान कदापि सहन करणार नसल्याचं आमदार लाड म्हणाले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद उफाळून आला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी आज गुरुवारी ‘सातारा बंद’ही पुकारला आहे.
दरम्यान, उदयनराजेंकडे पुरावा मागून शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या संजय राऊतांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी दिली आहे. “उदयनराजेंकडे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागितल्याने असंख्य शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने संजय राऊतांविरोधीत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहे,” असं कदम म्हणाले आहेत.
तसेच, श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. भारतीय जनता पक्ष या मस्तवालपणाचा निषेध करते. शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने छत्रपतींचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
Web Title: BJP MLA Prasad Lad criticizes Shivsena MP Sanjay Raut after statement over Chhatrapati Udayanraje Bhonsale.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं