शेतकरी आंदोलनात तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार | भाजपचा तिळपापड

मुंबई, १९ जानेवारी: नव्या कृषी कायद्यांविरोधात ठाकरे सरकार आक्रमक झालं असून मुंबईत होणाऱ्या शेतकरी आंदोलनात तिन्ही पक्षांचे मुख्य नेते सहभागी होणार आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारीला आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान यावरुन भाजपा खासदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटीचे पगार दोन तीन महिने होत नाहीत, बेस्टचंही तसंच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे आधी ते सुधारा मग रस्त्यावर या. आमचा काय रस्त्यावर येण्यासाठी नकार नाही. निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सरकारी यंत्रणा हाताळण्याचे ज्ञान, अभ्यास नाही. त्यांना ना खड्डे माहिती आहे, ना राज्याची तिजोरी माहिती आहे,” अशी खोचक टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केली. गाडी कशी चालवायची हे माहिती असेल, पण सरकार चालवण्याचा अभ्यास नाही. अज्ञान आहे. त्यामुळे सरकार पुढे जात नाही. पगार होत नाही, याला कारण उद्धव ठाकरे आहे, असे देखील खासदार नारायण राणे म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला हवं, असे सांगितलं होते. पण साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं वाटतं. उद्धव ठाकरेंनी लाचारी करुन पद मिळवलं. त्याही पदाचा घरात बसून वापर होत नाही. संभाजीनगर नाव करा, अशी हूल देत आहे. पुत्र मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही, हे दुर्देव आहे, असेही नारायण राणे म्हणाले.
News English Summary: The Thackeray government has become aggressive against the new agriculture laws and the main leaders of the three parties will participate in the farmers’ agitation in Mumbai. A farmers’ agitation will be held on January 23, 24 and 25 at Azad Maidan to support the farmers of Delhi. Nawab Malik has informed that National President of NCP Sharad Pawar and Chief Minister Uddhav Thackeray will participate in this agitation. Meanwhile, BJP MP Narayan Rane has expressed anger over this. He was speaking at a press conference in Mumbai.
News English Title: BJP MP Narayan Rane has expressed anger over Mahavikas Aghadi leaders participating in farmers protest news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं