मोदी-शहा, फडणवीस भेटीचा राज्य सरकार पाडण्याशी संबंध नाही | आम्ही 2024'च्या तयारीला लागलोय - रावसाहेब दानवे

मुंबई, ०२ जुलै | देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली.
महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मोजके आणि महत्त्वाचे भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना लक्ष करून सरकार अस्थिर करण्याची योजना आखली गेल्याच म्हटलं जातंय.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार आणि संजय राऊत यांनी यापूर्वीच प्रतिक्रिया दिल्या आहेत. सरकार पाच वर्ष चालेल आणि ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नैत्रुत्वात ठामपणे काम करेल असं म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यातल्या विरोधी पक्षाच्या नेत्याने केंद्रातल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेटही त्याच स्वरुपाची आहे. त्याचा महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याचा किंवा सरकार अस्थिर करण्याचा काहीच संबंध नाही, असं सांगतानाच आम्हाला सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही. आम्ही 2024च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असं भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार पाडण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सरकार पाडण्याच्या नादात नाही. राज्यातील सत्ताधारीच सरकार पाडण्याच्या वावड्या उठवून संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा दानवे यांनी केला.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BJP MP Raosaheb Danve statement on Devendra Fadnavis Amit shah meeting news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं