मराठा आणि बहुजन मतं विभागणीसाठी वक्तव्य? राज्याचं विरोधी पक्षनेते पद वंचित'कडे असेल: मुख्यमंत्री

नांदेड : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये पोहोचली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत राहिला आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच भविष्यात वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्षात असेल, असं भाकीतही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलं.
पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीला भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणत असल्याचा आरोप होतो, यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच बी टीम व्हायला लागल्या आहेत. वंचित आघाडी ए टीम व्हायला लागली आहे. मला असं दिसतय की पुढच्या विधानसभेत विरोध पक्ष किंवा विरोधी पक्षनेता वंचितचा असेल तो काँग्रेस एनसीपीचा नसेल.
शनिवारी सकाळी नांदेड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी कामगार मंत्री सभांजी पाटील निलंगेकर, भारतीय जनता पक्ष प्रदेश महासचिव आ़ सुजितसिंह ठाकूर, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, खा़ प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष आ़ राम पाटील रातोळीकर, शहर महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आदी उपस्थित होते़ आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पक्षाची शंभर टक्के युती राहिल, असे स्पष्टीकरणही फडणवीस यांनी यावेळी दिले़ नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने आक्षेप घेतल्याबाबत विचारले असता, नारायण राणे हे सध्या भाजपमध्येच आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार आहेत़ त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करण्याचा विषय आहे़ याबाबतचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेवून करण्यात येईल असे फडणवीस म्हणाले़.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं