भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र भाजपने नव्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार होऊन मंत्रीपदी विराजमान झालेले रावसाहेब दानवे सध्या दिल्लीच्या राजकारणात गेल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी वरानी लागली आहे तर मुंबई शहराच्या अध्यक्ष पदाची माळ मंगलप्रभात लोढा यांच्या गळ्यात पडली आहे.
दरम्यान थोड्या वेळापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, काहीवेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच मंगल प्रभातलोढा यांना मुंबई भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Chandrakant Patil appointed as the President of Bharatiya Janata Party (BJP), Maharashtra. pic.twitter.com/Qoa8R3VBqX
— ANI (@ANI) July 16, 2019
स्वच्छ प्रतिमा आणि संघटनेत केलेलं काम यामुळेच त्यांची निवड करण्यात आली असल्याचं चंद्रकांत पाटील यांच्याकडे जवाबदारी देण्यात आल्याचं बोललं जात असलं तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याने ते त्यांच्या अधिक विश्वासातील असतील आणि त्यामुळेच त्यांना हे पद दिलं गेलं असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे. राज्यात आता काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त न ठेवता लगेच भाजपने ही निवड जाहीर केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं