संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार - भाजपने डिवचलं

मुंबई, १२ जून | ठाकरे सरकारने जेवढी ताकद आम्ही अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर कोर्टात लावली, तेव्हढी ताकद मराठा आरक्षणासाठी लावली नाही, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथे बोलत होते.
मराठा आरक्षणाकडे ठाकरे सरकारने दुर्लक्ष केलं. आम्ही अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर न्यायालयात मोठी ताकद लावली तितकी सुद्धा इथे लावली नाही. अभ्यासासाठी तज्ज्ञांची गरज भासते, या विषयात चालढकल चालली आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
तसेच संभाजीराजे छत्रपती हे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजपचेच खासदार आहेत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संभाजीराजे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार आहेत. मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
News English: BJP state president Chandrakant Patil statement on MP Sambhajiraje Chhatrapati over Maratha Reservation news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं