कोर्टाच्या सर्व सुनावणीला गैरहजर | आता न्यायालयाच्या 'या' निर्णयाने कंगना अडचणीत येणार

मुंबई, २७ जुलै | अभिनेत्री कंगना राणौत आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अभिनेत्री कंगना आणि वाद हे समीकरण आहे. मात्र न्यायालयाने कंगनाला चांगलाच दणका दिला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा केला आहे. परंतु एकाही सुनावणीला कंगना न्यायालयात हजर राहिली नाही.
त्यामुळे कोर्टाने कंगनाच्या या वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर पुढील सुनावणीला कंगना न्यायालयात हजर राहिली नाही तर, तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दात खडसावलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कंगना राणौत समाज माध्यमांवर नेहमी व्यक्त होत असते. याच दरम्यान कंगना राणौत हिने एका वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखती दरम्यान तीने गीतकार जावेद अख्तर यांच्या विषयी अपमानास्पद शब्द वापरले होते. यामुळे नाराज झालेल्या जावेद अख्तर यांनी कंगना राणौत हिच्या विरोधात मानहानीचा दावा न्यायालयात दाखल केला होता.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Bollywood actress Kangana Ranaut in problem over defamation case of Javed Akhtar news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं