समोर पैलवानंच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना पावसात भिजणारे पवार पुन्हा आठवले

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त काय गाजलं असेल तर ते साताऱ्यातलं शरद पवारांचं पावसातलं भाषण. शरद पवारांच्या या पावसात भिजण्यावर आता मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केली आहे. निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पावसात भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. ते मुबंईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी युतीच्या वादावरही मोठं वक्तव्य केलं आहे.
शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली आणि त्याचा परिणाम निवडूक निकाल आणि राज्यातल्या राजकारणावर दिसून आला. त्या एका भाषणाने भाकरी फिरवली. पर्यायाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागाही वाढल्या. कौल जरी महायुतीला मिळाला असला तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागाही वाढल्या. विरोधकांना चेहराच उरलेला नाही, समोर पैलवान दिसतच नाही या सगळ्या उत्तरांना शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ज्याचा परिणाम मतदानावरही झाल्याचं पाहण्यास मिळालं.
विधानसभा निवडणुकीआधी अनेक आमदार भारतीय जनता पक्षात गेले असले तरीही राष्ट्रवादीनं चांगली लढत दिली. त्यावरुन अनेकांनी शरद पवारांच्या विजिगीषू वृत्तीचं कौतुक केलं. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी पवारांना टोला लगावला. ‘कोण त्यांना (पवारांना) मॅन ऑफ द मॅच म्हणतंय. कोण मॅन ऑफ द सीरिज म्हणतंय. पण सरकार कोणाचं स्थापन होतं हे महत्त्वाचं असतं,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं