औरंगाबाद पंचायत समितीत राडा | भाजपच्या उपसभापतीला दालनात घुसून मारहाण

औरंगाबाद, ०२ ऑगस्ट | औरंगाबादच्या पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत तूफान राडा झाला. पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती अर्जुन शेळके यांच्या दालनात घुसून सोमवारी मारहाण करण्यात आली. काँग्रेस सदस्यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, अर्जुन शेळके यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर 4 दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत ते उपसभापती म्हणून निवडून आले. काँग्रेसने त्याचाच राग काढल्याचा आरोप केला जात आहे.
काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यांनी नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच उपसभापतीची निवड झाली, त्यामध्ये ते विजयी झाले आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. 29 जुलै रोजी औरंगाबाद पंचायत समितीच्या कार्यालयात झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अनुराग शिंदे यांना 9 मते तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्जुन शेळके यांना 10 मते मिळाली.
काँग्रेसच्या सदस्यांना हा पराभव सहन झाला नाही. त्यामुळेच त्यांनी सोमवारी अचानक आपल्या दालनात घुसून हल्ला केला असा आरोप शेळकेंनी केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार हरिभाऊ बागडे यांनी पंचायत समितीला भेट दिली. घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये कार्यालयात झालेली धुमश्चक्री आणि खुर्च्या भिरकावल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. काही खिडक्यांच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Clash between BJP and congress activists in Aurangabad panchayat samiti news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं