पत्नीच्या हट्टापायी सरकारी बँकेला डावलून पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती AXIS बँकेत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून AXIS बॅंकेत वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात फडणवीस आणि राज्य सरकारवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडवणीस या AXIS बॅंकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने बँकेला झुकते माप देत राष्ट्रीय बँकांना तोटा होणारा हा निर्णय घेण्यात आल्याचे या याचिकाकार्त्याने आरोप केले आहेत.
मोहनीष जबलपुरे यांनी मागील आठवड्यामध्ये मुंबई हायकोर्टात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारने ११ मे २०१७ रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील पोलिसांची बँक खाती तसेच संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खासगी बँकेमध्ये उघडण्यास सांगितल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत AXIS बॅंकेला मुद्दाम झुकते माप दिले. या निर्णयामुळे राष्ट्रीय बँकांना फटका बसला असून त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. या महिन्याच्या अखेरीसपर्यंत या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारने जारी केलेल्या या परिपत्रकानुसार घेण्यात आलेले सर्व निर्णय रद्द करावेत. यासंदर्भात सरकारने घेतलेले सर्व निर्णय, परवाणग्या, करार रद्द करावेत अशी मागणी जबलपुरे यांनी कोर्टाकडे केली आहे. तसेच हा निर्णय घेताना AXIS बॅंक आणि राज्य सरकारमध्ये काय करार झाला आणि या निर्णयानंतर जेवढी पैशांची देवाणघेवाण झाली या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही जबलपुरे यांनी कोर्टाकडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या AXIS बॅंकेत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असल्याने या बँकेला सरकारने झुकते माप दिल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात काही विरोधी निर्णय लागल्यास विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या अडचणीत येऊ शकता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एखादा मोठा क्लाईंट कोणत्याही बँकेला ज्याच्या मार्फत दिला जातो, त्याला मोठे इंसेण्टिव दिले जातात जसे एखाद्या सामान्य एजण्टला दिले जातात. त्यात एखाद्या सरकारी खात्यातील कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर सरकारी फायदे जेव्हा एखाद्या बँकेत जमा केले जातात तेव्हा संबंधित बँकेतून एकरकमी मोठी उलढाल होते. तसेच संबंधित खात्याचे कर्मचारी बँकेच्या गृहकर्ज, वाहन कर्ज, खाजगी कर्ज, क्रेडिट कार्ड आणि इतर योजनांचे देखील थेट ग्राहक होतात आणि तोच बँकांच्या मुख्य मिळकतीचा स्रोत असल्याने बँका बक्कळ पैसा कमावतात. त्यात सरकारच्या एखाद्या योजनेचे पैसे देखील तिथून वर्ग होणार असतील तर बँकांना अशा ग्राहकाकडून अनेक आर्थिक फायदे होतात असं तज्ज्ञांनी सांगितलं. त्यामुळे अशा व्यवहारात ग्राहक आणून देणाऱ्या व्यक्तीला कोणताही मोठा आर्थिक फायदा झाला नसेल असं म्हणणं अव्यवहार्य ठरेल असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं.
दरम्यान, AXIS बँकेबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या आणि त्यासंबंधित तक्रारी पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांकडे गेल्या होत्या. त्यानंतर दुसरी बॅंके शोधण्याच्या सूचना मंत्रालयात गेल्या होत्या, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याच बँकेत उच्च पदावर असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा काहीच निभाव लागला नाही असं पोलीस खात्यातील सूत्रांनी सांगितलं. आजही पोलीस कर्मचाऱ्यांच्या AXIS बँकेबाबत अनेक तक्रारी आहेत मात्र अमृता फडणवीस AXIS बँकेत कामाला असल्याने काहीच शक्य नसल्याची भावना अनेक पोलीस व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच AXIS बँकेत कामाला असणाऱ्या अमृता फडणवीस यांना AXIS बँकेने मोठा हुद्दा बहाल केला आणि त्यानंतर राज्य सरकार संबंधित कर्मचाऱ्यांची खाती सरकारी बँकांना बगल देऊन या खाजगी बँकेत वर्ग होण्यास सुरुवात झाल्याचे अनेकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं आहे. त्यामुळे या विषयात सखोल चौकशी करून अजून कोणती सरकारी खाती AXIS बँकेकडे आहेत त्याचा थेट न्यायालयामार्फत तपास करणे गरजेचे आहे असं अनेकांनी मत व्यक्त केलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं