काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपपेक्षा वंचितला पसंती; भाजपाची देखील डोकेदुखी वाढणार

बीड : भारिप बहुजन पक्ष आणि एमआयएम’च्या आघाडीनंतर निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा आरोप वरोधकांनी वारंवार केला आहे. इतकंच नाही समाज माध्यमांवर देखील तीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या एकूण प्रतिक्रिया पाहिल्यास त्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाला पोषक ठरतील अशाच असल्याची चर्चा देखील प्रसार माध्यमामध्ये पाहायला मिळते.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा पडल्या तर, त्याच्या थेट फायदा हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला झाल्याचं आकडेवारी स्पष्ट सांगते. तसेच लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या सभांना देखील भाजपने पैसा\पुरवल्याचा दावा अनेकांनी केला होता. लोकसभा निवडणुकीत लढवून देखील वंचित आघाडीने केवळ औरंगाबादची जागा जिंकली होती आणि त्याला देखील स्थिक राजकीय समीकरणं जवाबदार होती. प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत स्वतः प्रकाश आंबेडकर दोन जागांवरून लढले तरी पराभूत झाले आणि सोलापूरच्या जागेवर तर ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले अशी अस्वथा झाली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी देखील मुस्लिम समाजाची मतं पडली नसल्याचा आरोप एमआयएम’वर केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडीवर पुन्हा तोच आरोप होऊ लागला आहे.
मात्र असं असलं तरी विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आणि आजी-माजी आमदार भारतीय जनता पक्षापेक्षा वंचित आघाडीत प्रवेश करणं पसंत करत असल्याने भाजपाची आणि त्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादीची देखील डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यादाच वंचित बहुजन आघाडीने सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस वंचितनं राज्यभरात आपलं जाळं पसरवलं. वंचित बहुजन आघाडी ही नॉन हिंदू विचारधारेची असल्यामुळे हिंदूंचा पुरस्करता या आघाडीकडे भटकणार नाही, परंतू पुरोगामी विचारांचं लेबल असणारी कॉंग्रेस एनसीपीच्या नेत्यांनी वंचितकडे धाव घेणे सहज शक्य आहे.
लोकसभेत वंचित आघाडीला केवळ एका जागेवर यश मिळाले असे म्हणता येणार नाही. उमेदवार जरी निवडून आले नसले तरी त्यांचा जनसंपर्क वाढण्यात मदत झाली आहे. तसेच कॉंग्रेसची राज्यात अवस्था पाहता कॉंग्रेस एनसीपीच्या नेत्यांनी वंचितकडे धाव घेणे नैसर्गिक मानले जात आहे. लोकसभेत वंचित फॅक्टरचा जोरदार फटका कॉंग्रेस राष्ट्रवादीला बसला आहे.
वंचित आघाडी कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नात असले तरी आघाडीच्या अटी शर्तींवर दोन्ही पक्षांनी जणू अडेलतट्टूपणाचीच भूमिका घेतली असल्याचे दिसते. अशा वेळेत कॉंग्रेस राष्टवादीचेनेते वंचितमध्ये प्रवेश करून प्रकाश आंबेडकरांची साथ देण्यास तयार होत आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि काँग्रेसचे नेते राजेसाहेब देशमुख हे लवकरच वंचित बहुजन आघाडीमध्ये जाणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. पृथ्वीराज साठे आणि़ राजेसाहेब देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडी विधानसभेसाठी घेत असलेल्या मुलाखतीला हजेरी लावली आहे. दरम्यान, या दोन नेत्यांनी मुलाखती देणं हा काँग्रेस-एनसीपीसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं