मोदी तेरे राज मे, सायकल आगयी हाथ मे | इंधन दरवाढ, महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल-बैलगाडी मोर्चा

औरंगाबाद, ०८ जुलै | राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भरपावसात सभा घेतली होती. त्याचाच कित्ता गिरवीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भरपावसात भिजत इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात सायकल मोर्चा काढला. यावेळी ‘माेदी तेरे राज मे, सायकल आगीय हाथ मे’, ‘मोदी सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
नाना पटोले यांच्या नेतृत्वात शहर आणि जिल्हा काँग्रेसतर्फे या सायकल मोर्चाचे नेतृत्व करण्यात आले होते. आणि नेमकी गुरूवारी सकाळपासून पावसाला सुरूवात झाली. स्थानिक संविधान चौकातून सकाळी ११ वाजता निघणारा मोर्चा पावसामुळे उशिरा निघेल वा पाऊस थांबल्यावर निघेल, असे सर्वांना वाटत होते. पण, नाना पटोले यांनी भर पावसात मोर्चा काढला. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, आमदार राजू पारवे, व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रवक्ते अतुल लाेंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यत मोर्चा निघाला. मोर्चात कार्यकर्ते छत्र्या घेऊन सहभागी झाले होते. विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
खाण्याचे तेल,पेट्रोल-डिझेल-गॅस,जिवनावश्यक वस्तूंची दर नरेंद्र मोदी/भाजपा सरकार नी गणणाला भिडवली त्यामुळे सामान्य जनतेला महागाईच्या खाईत ढकलले.
सामान्य जनतेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष उठवित आहे.
महागाईच्या विरोधात नागपुर येथे सायकल रैली काढून आयुक्तांना निवेदन दिले pic.twitter.com/f0dad366sd— Nana Patole (@NANA_PATOLE) July 8, 2021
यावेळी माध्यमांशी बोलताना पटोले यांनी मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. येत्या १७ तारखेपर्यत विविध विषयांना घेऊन आंदोलन करणार असल्याचे सांगितले. आज पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करणे शक्य असताना मोदी सरकार भाव वाढवून देशातील लोकांना कंगाल करीत असल्याचे पटोले म्हणाले. महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडल्याचा आरोप पटोले यांनी केला. ऊन, वादळ, वारा वा पाऊसाची तमा न बाळगता सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसची लढाई असल्याचे ते म्हणाले. आमच्या आंदोलनाची दखल घेत मोदी सरकारला झुकावे लागेल व दरवाढ मागे घ्यावी लागेल असे ते म्हणाले.
औरंगाबादेत सायकलसह बैलगाडीवर मोर्चा:
काँग्रेसचा शहागंज ते विभागीय आयुक्त कार्यालयावर पेट्रोल दरवाढीच्या विरोधात रॅली काढण्यात आली.यामध्ये शहराध्यक्ष उंटावर तर काही पदाधिकारी घोड्यावर तर काही सायकल आणि बैलगाडीमध्ये बसून या मोर्चात सहभागी झाले आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Congress Morcha against inflation and Petrol Diesel price hike in leadership of MLA Nana Patole news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं