VIDEO | पदाचा मान बाजूला ठेवत उपमुख्यमंत्र्यांकडून कार्यकर्त्याच्या चहा स्टॉलचं उद्घाटन

पुणे, २५ जुलै | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना त्यांची दुसरी बाजू बारामतीकरांना पाहायला मिळतात. अजितदादांचं असंच एक दिलखुलास रुप आज बारामतीत पहायला मिळाले. माझ्या चहाच्या टपरीचं उद्घाटन करा, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखलवल्यावर अजितदादांनी उद्घाटन तर केलंच शिवाय त्याच्या टपरीतल्या चहाचाही आस्वादही घेतला.
बारामती दौऱ्यावर असताना एका टपरी चालकाने माझ्या चहाच्या टपरीचे उद्घाटन करा, अशी इच्छा अजितदादांजवळ व्यक्त केली. ती इच्छा व्यक्त करताच अजितदादांनी त्या टपरी चालकाच्या इच्छेला मान दिला. फिरत्या वाहनावर चहा स्टॉल सुरु केला आहे याचे उद्घाटन आपण करावे अशी इच्छा आहे, असं इच्छा बोलून दाखवल्आनंतर अजितदादा कार्यकर्त्याच्या टपरीवर पोहोचले.
विशेष म्हणजे अजित पवारांनी, तुझ्या चहाची क्वॉलिटी आहे का? असे विचारून स्वतः चहाचा आस्वाद घेतला. खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते आपल्या गुळाच्या चहाच्या स्टॉलचे उद्घाटन झाल्याने या कार्यकर्त्याचा आनंद गगनात मावेना झाला होता. सध्या बारामतीमधील समाज माध्यमांवर या उद्घाटन सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, अजित पवार चहाच्या स्टॉलचे उद्घाटन करताना दिसत आहेत. दरम्यान, अजित पवार यांचा आज दुपारपर्यंत बारामीत दौरा नियोजित आहे.
पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत चहाच्या स्टॉलचे उद्घाटन pic.twitter.com/NLO61lR6Vx
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) July 25, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Deputy CM Ajit Pawar Inaugurate tea Stall in Baramati news updates.
ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अॅप डाऊनलोड करा: Click Here to Download
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं