आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही - देवेंद्र फडणवीस

मुंबई, ०१ ऑगस्ट | वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत. त्यानंतर लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेल्याचं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. याच प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले फडणवीस:
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्याविषयी विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, “आमच्यासाठी विषय संपला आहे, तोडफोड करणं आमची संस्कृती नाही. आम्ही तोडफोड करत नाही. काल प्रसाद लाड यांचे जे वक्तव्य समोर आले किंवा जे त्यांनी म्हटल्याचे सांगितले गेले, त्याबद्दल त्यांनी व्हिडीओद्वारे खुलासाही केला आहे. आमच्यासाठी विषय संपला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
संजय राऊत, छगन भुजबळ यांच्या खोचक प्रतिक्रिया:
दरम्यान लाड यांच्या या वक्तव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसाद लाड यांच्यावर अतिशय खोचक पद्धतीने टीका केली. लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना यासंबंधी आमचे शाखाप्रमुख बोलतील असा खोचक वार संजय राऊत यांनी केला. तर नाशिकमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी लाड यांच्या वक्तव्यावर मिश्किल भाष्य करत त्यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला. ‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’, असं हसत हसत भुजबळ म्हणाले होते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Devendra Fadnavis statement over MLA Prasad Lad statement regarding Shivsena Bhavan news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं