फडणवीसांनी १० वर्षे तरी मी पुन्हा येईनची स्वप्ने पाहू नयेत - हसन मुश्रीफ

कोल्हापूर, २१ मे | ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पुढील दहा वर्षे तरी पाहू नयेत,असा सल्ला दिला आहे.ते पुढील साडेतीन वर्ष नव्हे तर १० वर्षात देखील महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू शकणार नाहीत असा टोला लगावून, महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने फडणवीस यांची गोव्यात जास्त आवश्यकता आहे. त्यांना गोव्याच्या टास्क फोर्सचा अध्यक्ष करण्यात यावे असेही मुश्रीफ म्हणाले.ते कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे नेहमी आघाडीवर असतात.भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असल्याने मंत्री मुश्रीफ हे कोल्हापुरात असले काय किंवा मुंबईत असले काय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर कडाडून हल्ला चढवतात.आणि नेहमीच चर्चेत असतात.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच गुजरातचा दौरा केला.परंतु त्यांनी कोकण आणि केरळचा सुद्धा हवाई दौरा करणं अपेक्षित होते. पंतप्रधान हे केवळ गुजरातचे नाहीत ते संपूर्ण देशाचे आहेत. पण,ते तसे वागताना दिसत नाहीत.
News English Summary: Rural Development Minister Mushrif has advised former Chief Minister and current Leader of Opposition Devendra Fadnavis not to dream of ‘I will come again’ for at least the next ten years. Fadnavis is in high demand in Goa as corona infections have been reduced in Maharashtra.
News English Title: Devendra Fadnavis will never CM again for next ten years said minister Hasan Mushrif news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं