गडकरी म्हणतात आयुष्याभर टोल भरा; राज्यातले नेते म्हणतात दादांचं ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असतो असं धक्कादायक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला होतं. सांगली येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केले होते.
मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचं ओळखपत्र दाखवून देखील टोल नाक्यावर टोलमाफी दिली जात नसल्याची तक्रार केली होती. यावर कार्यकर्त्यांना उत्तर देताना सुरेश हाळवणकर यांनी सांगितलं की, “हे ओळखपत्र टोलनाक्यावर चालत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ओळखपत्रावर चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्या कारणाने टोल नाक्यावरील कर्मचारी काही तरी समस्या निर्माण होऊ शकते, आपला टोल काढून घेतला जाऊ शकतो असा विचार करतात. आमदार,नेते आणि काही कार्यकर्ते गेले म्हणून काय होतं असा विचार करुन ते सोडून देतात.
एकीकडे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार टोलमुक्तीच्या बाता मारत सत्तेवर आलेले असताना महाराष्ट्राचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील, असे सांगितले आहे. दरम्यान, देशातील विविध भागात टोल वसुलीवरून काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाला गडकरी यांनी आज लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी ज्या भागातील जनतेची टोल देण्याची क्षमता आहे त्या भागातच टोल वसुली केली जाते. या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जात असल्याचे ते म्हणाले.
सरकारकडे विकासकामांसाठी हवा असलेला पैसा नाही. पाच वर्षांत देशात ४० हजार किलोमीटरचे राज्यमार्ग तयार करण्यात आले आहेत. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागणार. टोल उभ्या आयुष्यात बंद होऊ शकणार नाही, परंतु, गरजेनुसार थोडा कमी-जास्त होऊ शकतो, असे गडकरी म्हणाले.
दरम्यान, गडकरी यांनी सोमवारी वाहन कायद्यात बदल केले आहेत. या विधेयकामध्ये लहान मुलांसाठी आणखी दोन नियम करण्यात आले आहेत. कारमध्ये बुस्टर सीट लावावी लागणार आहे. मागील सीटवर बसल्यास हा नियम लागू होणार आहे. मागील सीटवर बुस्टर किंवा चाईल्ड सीट लावता येते ज्यामध्ये लहान मुलाला बसवून त्याला सीटबेल्ट लावता येणार आहे. यामुळे अचानक ब्रेकिंग किंवा अपघात झाल्यास मुलाला मार बसण्याची शक्यता कमी होईल. तसेच ४ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी बाईकवरून जाताना हल्मेट घालावे लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं