राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानं महाराष्ट्र सैनिकाची आत्महत्या

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. प्रवीण चौगुले असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. कळवा येथील विटावा परिसरात चौगुलेच्या राहत्या घरी काल रात्री ही घटना घडली आहे.
प्रवीण चौगुले हा ठाण्यातील विटावा परिसरात राहणारा होता. दरम्यान, राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर प्रवीणने ईडीविरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट लिहिल्या होत्या. यासंदर्भात लोकमतने मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, ”राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्याने आपण टेन्शनमध्ये असल्याचे प्रवीणने आपल्या निकटच्या मित्रांना सांगितले होते. तसेच त्याविरोधात टोकाचे पाऊल उचलणार असल्याचेही तो म्हणाला होता. परंतु मित्रांनी त्याला असे न करण्याचा सल्ला दिला होता. पण मंगळवारी रात्री प्रवीण याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली.
प्रविण हा राज ठाकरे यांचा कट्टर समर्थक होता. तसेच तो अविनाश जाधव यांचा निकटवर्तीय मानला जात होता. त्याने उचललेल्या या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं