२४ तासात चौकशीसाठी हजर राहा | नाहीतर घरी येऊन चौकशी - ईडीचं उत्तर

मुंबई, २९ जून | ईडीच्या कचाट्यात सापडलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स बजावून आज (२९जून) सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, अनिल देशमुख यांनी वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. यासंदर्भात त्यांनी ईडीला पत्र देखील लिहिलं होत दरम्यान, या पत्राला ईडीने उत्तर देत २४ तासांत ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
देशमुख यांनी वकिलामार्फत वय, तसंच कोविड-१९ चा धोका, सरकार कडून लावण्यात आलेले निर्बंध या सर्व गोष्टींचा विचार करून मी ईडी कार्यलयात हजर राहू शकत नाही, असं ईडीला सांगितलं. जमल्यास माझा जबाब ऑडिओ, व्हिडिओमार्फत रेकॉर्ड करण्यात यावा, अशी विनंती करणारं पत्र ईडीला पाठवलं होतं.
देशमुख यांच्या पत्रानंतर ईडीने त्यांना नव्याने निरोप पाठवला आहे. चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात २४ तासांत हजर राहा, अन्यथा घरी येऊन चौकशी करु, असं ईडीने म्हटलं आहे. त्यामुळे आता ईडीच्या या आक्रमक भूमिकेमुळे अनिल देशमुख कोणती भूमिका घेतात याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकूण ईडीचं सर्वकाही आधीच ठरल्याचं म्हटलं जातंय आणि याचे संकेत तेव्हाच मिळाले होते जेव्हा NIAच्या आडून सीबीआय या प्रकरणात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाने सीबीआयला अनिल देशमुखांची केवळ १५ दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर या प्रकरणात ईडीला मार्ग करून देण्यात आला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना अटक करून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना चौकशी आडून बदनाम करून सोडायचं अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: ED reply to Anil Deshmukh over request letter news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं