पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही: देवेंद्र फडणवीस

पाथर्डी: ‘दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजोरी व मुजोरी जनतेला माहीत असल्याने मतदार त्यांना थारा देणार नाहीत, असं सांगत, ‘पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलं. महाजानदेश यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसला धारेवर धरले. ‘कोणत्याही यात्रेचे एक दैवत असते. मी काढलेल्या यात्रेचे दैवत हे राज्यातील जनता असून आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधण्यासाठी मी महाजानदेश यात्रा काढलेली आहे असं फडणवीस म्हणाले.
Day-10 #MahaJanadeshYatra reaches Ahmednagar.. Live from Pathardi #महाजनादेशयात्रा https://t.co/ix3qVi9oTc
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 26, 2019
सत्तेत असताना जनतेची कामे केली नाहीत. त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली आणि ते ईव्हीएमला दोष देतात. ईव्हीएम हे मशीन आहे. ईव्हीएम त्यांना हरवत नाही तर मतदार त्यांना हरवतो. कारण, आम्ही जनतेच्या मनात घर केले आहे. पाच वर्षात आम्ही प्रामाणिकपणे कामे केली आलेल्या आव्हानांचा सामना केला व जनतेचे प्रश्न सोडविले. त्यांच्या सत्तेच्या १५ वर्षाच्या काळात जेवढी कामे झाली. त्यापेक्षा जास्त कामे आम्ही पाच वर्षात करून दाखविली. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे व येणारी २५ वर्षे सत युतीचीच येणार असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
#महाजनादेशयात्रा च्या निमित्ताने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे पाथर्डी येथे आगमन झाले, तेव्हा मराठा क्रांति मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.@Dev_Fadnavis #MahaJanadeshYatra pic.twitter.com/ST05CSixKh
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 26, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं