कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हा एक्झिट पोलच्या सर्व्हेचा भाग नसतो: सविस्तर

मुंबई: यापूर्वी देशातील अनेक नामांकित प्रसार माध्यमांनी २०१४ ते २०१८ या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोलचा अभ्यास केला. त्यावरून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, एक्झिट पोलमुळे आपल्याला केवळ कोण जिंकणार याचा अंदाज येतो, मात्र त्यातून कोणत्या पक्षाच्या नेमक्या किती जागा निवडून येतील, हे खात्रीपूर्वक समजू शकत नाही. अगदी यासंबंधित उदाहरण म्हणजे २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकतर्फी जिंकेल असं भाकीत त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक्झिट पोलनं केलं होतं. त्यावेळी C-Voterनं असा अंदाज व्यक्त केलं होतं की भारतीय जनता पक्षाला एकूण १११ जागा प्राप्त होतील आणि काँग्रेसला केवळ ७१ जागांवर समाधान मानावे लागेल. तर दुसरीकडे टुडे’ज चाणक्यनं म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाला तब्बल १३५ जागा मिळतील आणि काँग्रेसला केवळ ४७ जागा मिळतील.
संबंधित एक्सिट पोलच्या आकडेवारीनुसार एकूण जागांपैकी तब्बल ६५ टक्के जागा या एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळतील असं जवळपास सर्वच एजन्सीजनं ठामपणे म्हटलं होतं. मात्र जर जाहीर झाल्यावर भारतीय जनता पक्षाच्या अंदाजापेक्षा तब्बल १० टक्के जागा कमी झाल्या आणि काँग्रेस सत्तेत येणार का असं चित्र सकाळी ११ वाजेपर्यंत दिसत होतं. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत ९९ जागा मिळाल्या होत्या. अभ्यासातून हेच स्पष्ट झालं आहे की, एक्झिट पोलमधून केवळ विजेता पक्ष कोण याचा अंदाज वर्तविण्यात येतो, मात्र कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील हे सांगता येत नाही. तसेच एक्झिट पोलसाठी जो सर्व्हे केला जातो, त्यात कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील याचा अंदाज देखील घेतला जातो आणि मग त्या मतांच्या टक्केवारीवरून त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, याचे अंदाज वर्तविले जातात.
उदाहरणार्थ, एखाद्या पक्षाला २५ टक्के मत मिळणार असेल तर त्या आधारावर त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, हे ठरवलं जातं. मात्र कधीकधी एखाद्या पक्षाच्या मतांची टक्केवारी आणि निवडून आलेल्या जागांमध्ये मोठा फरक दिसून येतो. अनेकवेळा तर मतांची टक्केवारी तेवढीच असते, परंतु संबंधित पक्षानं फार कमी फरकानं जागा जिंकलेली किंवा हरलेली असते असं देखील निदर्शनास आलं आहे. त्यावर राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या मते, “एखाद्या पक्षाच्या नेमक्या जागा किती येतील, हे एक्झिट पोल करणाऱ्यांच्या सँपलिंगवर अवलंबून असतं. आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे कोण जिंकणार हे सांगता येत असलं, तरी नेमक्या जागा सांगता येतीलंच, असं चित्र नाही.
मुख्य म्हणजे एखादा एक्झिट पोल व्यवस्थित करून देखील त्याचे अंदाज पूर्णपणे चुकू शकतात आणि मिळणाऱ्या जागांमध्ये देखील मोठी तफावत असते. जागा किती मिळतील, याबाबत मोठी अनिश्चितता असू शकते. अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे तेथे नेमकं अध्यक्ष होणार हे सांगणं सोपं आहे. मात्र भारतात शेकडो जागा आणि इथली जातीय समीकरणं आणि इतर सामाजिक प्रश्न असं बरंच विचारात घेणं गरजेचं असल्याने आपल्याकडे एक्सिट पोलचे अंदाज वर्तविणे त्यांत कठीण काम आहे. C-voterचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी देखील वेगळा मुद्दा मांडला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘मुळात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हा एक्झिट पोलच्या सर्व्हेचा भागच नसतो. कोणत्या पक्षाला किती मतं (टक्केवारी) मिळतील आणि त्या टक्केवारीच्या तुलनेत जागांचा अंदाज बांधला जातो’.
एक्झिट पोलबाबत ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या ‘The Verdict…Decoding India’s Election’ या पुस्तकात १९८० ते २०१८ दरम्यान झालेल्या ८३३ एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत. त्यानुसार, ‘एक्झिट पोल खरे ठरण्याचा अंदाज ८४ टक्के इतका आहे’. दरम्यान, पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. परंतु भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात. भारतात याबाबत अजून सुधारणा होण्याची गरज आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, जेवढी विविधता भारतीय मतदारांमध्ये आढळून येते तेवढी पाश्चिमात्य देशातल्या मतदारांमध्ये आढळून येत नाही.” “तिथल्या लोकांच्या धर्म आणि जाती बरेचदा सारख्याच असतात. तसंच भारताच्या तुलनेत तिथं निवडणुका लढवणारे पक्ष देखील कमी असतात. त्यामुळे एक्सिट पोलबाबत भारतात खात्री देने शक्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं