मुख्यमंत्री असूनही फडणवीसांनी ५ वर्षांत स्व. गोपीनाथ मुंडें'चं स्मारक उभारलं नाही

मुंबई : भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्रिपदी राहूनही फडणवीस यांना गेल्या ५ वर्षांत भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारता आले नाही, अशा शब्दात खडसे यांनी हल्ला चढवला. त्यामुळे खडसे अद्यापही नाराज असल्याचं बोललं जात आहे.
ते म्हणाले, मागील सरकार गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारू शकले नाही. हा प्रकल्प सुमारे ३०-४० कोटी रुपयांचा आहे. शरद पवार यांच्याकडे जी मागणी केली तिच मागणी आता उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच जेव्हा या भागाचा दौरा असेल तेव्हा भेट देईन, असेही उद्धव ठाकरे म्हणाल्याचे खडसेंनी सांगितले.
तसेच पुढे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, “शरद पवार यांची मी जळगावमधील सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी गेला होतो. उद्धव ठाकरेंशीही त्याबाबतच चर्चा केली. तसंच १२ तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वाभिमान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी आपण आलो होतो”.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं