अनिल देशमुखांचे ईडीला पत्र | सुप्रीम कोर्टात आधीच आव्हान दिल्याने चौकशीसाठी हजर राहणार नाही

मुंबई, ०२ ऑगस्ट | 100 कोटी वसुली प्रकरणामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत सापडलेले आहेत. या प्रकरणी त्यांना सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. तसेच त्यांचा – मुलगा ऋृषीकेश यांना देखील समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.
अनिल देशमुख ईडी समोर आज सुद्धा उपस्थित राहणार नाही, त्यांच्या वतीने वकील इंदरपाल उपस्थित राहणार आहेत. याच अनुषंगाने अनिल देशमुख यांनी ईडीचा तपास अधिकाऱ्यांचे नावे एक पत्र जारी केले आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून वकील इन्दरपाल बी सिंग हे उपस्थित राहतील असे पत्राद्वारे कळवले आहे.
अनिल देशमुखांचे ईडीला पत्र:ईडीची माझ्या विरोधातील कारवाई कायदा, सत्तेचा गैरवापर! सुप्रीम कोर्टात आधीच आव्हान दिल्याने चौकशीसाठी हजर राहणार नाही; अनिल देशमुखांनी जारी केले पत्र pic.twitter.com/IKAyhoZIzZ
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) August 2, 2021
या पत्रामध्ये अनिल देशमुखांनी लिहिले की, ईडीची माझ्या विरोधातील कारवाई ही कायदा आणि सत्तेचा गैरवापर म्हणून करण्यात आली. मी सुप्रीम कोर्टात यापूर्वीच आव्हान दिले असल्याने चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सुप्रीम कोर्टात त्यांच्या अर्जावर 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. 30 जुलैला सुप्रीम कोर्टाने 3 ऑगस्ट ही तारीख देताच ईडीने सोमवारी समन्स जारी केला असे देशमुखांनी पत्रात लिहिले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Former home minister Anil Deshmukh letter to ED news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं