विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शेतकऱ्यांचा पुळका: राजू शेट्टी

मुंबई : मागील तब्बल ५ वर्षे राज्यातील शेतकरी दारिद्र्यातच खितपत पडले आहेत. बळीराजाचे अनेक प्रश्न गंभीर रूप धारण करत आहेत. त्यात भर म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत, उलट त्यामध्ये प्रचंड वाढ होत गेली आहे. अशा अनेक शेतकरी प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कधीच कडक शब्दात बोललेले ऐकीवात नाही. मग शेतकऱ्यांचा आत्ताच कसा तुम्हाला पुळका आला? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेला केला आहे.
राजू शेट्टी यांनी समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, मागील ४ वर्षातच एकूण १२,००० शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला अजून देखील भाव मिळालेला नाही. १७ जून २०१७ रोजी राज्य शासनाने कर्जमाफी केली, परंतु अद्यापही राज्यातील सुमारे ३० लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. ३४ हजार कोटी माफी केली असताना केवळ १९ हजार कोटींची कर्जमाफी झालेले आहे असं असताना केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्ताच तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कसे काय बोलू लागला आहात असा थेट सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
तसेच शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही, मुंबईत कार्यालय असणाऱ्या कार्पोरेट कंपन्यानी शेतकऱ्यांची प्रचडण प्रमाणात पिकविम्यात लूट केलेली आहे हे मागील ३ वर्ष चालू असताना अचानक आताच तुम्हाला साक्षात्कार कसा काय झाला. तिकडे राज्यातील शेतकरी दुष्काळाने ग्रस्त आहे, त्याला खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, टॅंकर माफीयाने उच्छाद मांडला आहे , चारा छावण्यात घोटाळे होत आहेत. या प्रश्नाकडे तुम्ही करड्या नजरेने कधीच बघितले नाही अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
काय आहे नेमकी राजू शेट्टी यांची ती पोस्ट?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं