हमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी

मुंबई, 10 जून | केंद्र सरकारने बुधवारी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. यानुसार, धानाच्या हमीभावात क्विंटलमागे ७२ रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली असून डाळी, तेलबिया व तृणधान्ये यांच्या हमीभावात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
२०२१-२२ पीक वर्षासाठी (जुलै-जून) १४ खरीप पिकांच्या किमान हमीभावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० ते ८५ टक्के अधिक फायदा मिळू शकेल, असे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी हमीभावाच्या घोषणेला खुलं आव्हान दिलं आहे. “६० टक्के हमीभाव वाढवत असल्याची घोषणा सरकारने केली आहे. पण सरकारचा हा दावा कोणत्याही तज्ञाने उत्पादन खर्चाचा विचार करून सिद्ध करून दाखवावा”, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. त्यामुळे नेमका हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की नाही, यावर नवी चर्चा सुरू झाली आहे.
News English Summary: The central government on Wednesday announced its decision in this regard. Accordingly, the guaranteed price of cereals has been increased marginally by Rs 72 per quintal and the guaranteed prices of pulses, oilseeds and cereals have also been substantially increased. The decision to increase the guarantee was taken at a meeting of the Union Cabinet chaired by Prime Minister Narendra Modi.
News English Title: Former MP Raju Shetty Slams union Government on MSP Hike Announcement news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं