निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आणि भाजप पसरवत असलेला EVM चा अर्थ वेगवेगळा कसा?

औरंगाबाद : ईव्हीएम मशीनवरील आक्षेपावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले आहे . २००४ ते २०१४ दहा वर्ष राज्यात पार्लमेंट ते पंचायत तुमची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडूण आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतांनाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेने ठरवला आहे असे फडणवीस यांनी ठणकावले. दरम्यान, ईव्हीएम बाबत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असाच केला होता हा योगायोग.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री मागील काही महिन्यांपासून ईव्हीएम’बाबत जाणीवपूर्वक एक वेगळीच मानसिकता निर्माण करत असून मुख्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असा असेल तरी भाजपचे अनेक राज्यातील खुद्द मुख्यमंत्रीच लोकांच्या मनात ईव्हीएम म्हणजे ‘एव्हरी वोट फॉर मोदी’ असा का बिंबवत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
औरंगाबाद येथील महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर करण्यात आले होते. तत्पुर्वी भव्य रोड शो काढण्यात आला. सभेला मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टिका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. पाणी योजनेचे प्रकरण न्यायालयात गेले आहे. न्यायालयात जे व्हायचे ते होईल, पण शहरातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे म्हणून पाणी पुरवठ्याची एकत्रित योजना तयार करा, असे आदेश मी दिले होते. त्यानुसार १६०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे.
राज्य सरकार ही योजना मंजूर करेल. योजनेसाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद देखील करेल. औरंगाबाद शहराला पाणी आम्ही निश्चितपणे पाणी देऊ. औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचे अनुदान दिले आहे. यापैकी ७५ टक्के निधी खर्च झाल्याचे दाखवा, आणखी २०० कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी दिले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं