पुरग्रस्तभागाला १०० टक्के कर्जमाफी द्या; एनसीपीच्या प्रतिनिधींकडून ५० लाखांची मदत: शरद पवार

कोल्हापूर : सांगलीत आलेल्या महापूरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘शिवस्वराज्य’ यात्रा स्थगित केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुराबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, शासकीय पातळीवर सर्व मदत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून 50 लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना करणार आहेत.
ऊसाचे वैशिष्ट्य त्या पिकाच्या उंचीपेक्षा जास्त पाऊस आले तर पीक वाया जाते. काही ठिकाणी फळबागांमध्ये द्राक्ष, डाळींब यांचे उत्पादन घेतले जाते, भाज्या घेतल्या जातात. शेतपिकाबरोबर बर्याच ठिकाणी जमिनीवरील माती वाहून गेल्याचे दिसत आहे, अशा शेतजमिनींचे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे. आता पाणी ओसरेल, तेव्हा या नुकसानीचा खरा आढावा घेता येईल. बांधलेली जनावरे शेतकर्यांनी सोडून दिली. कोल्हापूर, सांगली हा पट्टा महाराष्ट्रातील विकासाचा महत्त्वाचा पट्टा आहे, अशी स्थिती पूर्वी कधी पाहण्यात आली नव्हती. राज्य सरकारने नुकसान भरपाईची सुरू केली पाहिजे. पंजनामे सुरू केले पाहिजे. तसेच पुरग्रस्तभागातील लोकांना १०० टक्के कर्जमाफी दिली पाहीजे”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली आहे.
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकारी असा निर्णय घेतला आहे की आमच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या एक महिन्याचं वेतन या पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी देणार आहोत. याकरिता ५० लाख रुपयांचा धनादेश सोमवारी दिला जाईल.#MaharashtraFlood #Pune #PressConference
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 8, 2019
राष्ट्रवादीचा डॉक्टर सेल प्रभावी आहे. या सेलमधून संघटित डॉक्टर जशी गरज पडेल त्याप्रमाणे मतदकार्यासाठी रवाना होऊन संकटग्रस्तांसाठी वैद्यकीय सेवेची पूर्तता करतील.#MaharashtraFlood #Pune #PressConference
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 8, 2019
सांगलीतील अभूतपूर्व पुराला तोंड देताना ज्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा आलाय व जी माणसं अडकली आहेत त्यांनी या प्रसंगाला धीरानं तोंड देणं आवश्यक आहे. बचावकार्यातील बोटींमध्ये जेवढी क्षमता आहे तेवढीच माणसं बसवणं व ती माणसं बाहेर आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे – @Jayant_R_Patil pic.twitter.com/HD0z2iW7Bo
— NCP (@NCPspeaks) August 8, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं