संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मंजूर

मुंबई, ०४ मार्च: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावे लागलेले संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी 28 फेब्रुवारीला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपालांकडे राजीनामा पाठवण्यात आला. अखेर राज्यपालांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला. (Governor Bhagat Singh Koshyari has approved the resignation of Sanjay Rathod)
रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी आता पुढे काय अशी विचारणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नसल्याच्या बातम्या समोर यायला लागल्या. यावर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी केली होती.
News English Summary: Governor Bhagat Singh Koshyari has approved the resignation of Sanjay Rathod, who had to resign as a minister in the Pooja Chavan suicide case. Sanjay Rathod had tendered his resignation to the Chief Minister on February 28. The resignation was sent to the Governor by the Chief Minister’s Office. Finally, the governor accepted Rathod’s resignation.
News English Title: Governor Bhagat Singh Koshyari has approved the resignation of Sanjay Rathod news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं