बलात्कार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा - राज्यपाल

नागपूर: देशभरात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना समोर येत आहे. हैदराबादमधील पशुवैद्यक महिलेवरील बलात्काराने देश हादरला होता. तसेच हैदराबादमधील बलात्कार आणि हत्याप्रकरणाची घटना ताजी असतानाच, ओडिशातही पुरी येथे एका पोलीस हवालदारासह दोघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते. नागपुरात देखील एका ५ वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे करुन अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. त्यातच बलात्कारच्या घटना थांबवायचे असल्यास लहान मुलांनी संस्कृत श्लोक शिकायला हवे, असं विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यापालांच्या या बेजबाबदार विधानावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.
नागपूर विद्यापीठातील जमनालाल बजाज ऍडमनिस्ट्रेटिव्ह भवनाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महिलांवरील होणारे अत्याचार कसे थांबवण्यात येतील, यावर आपलं मत व्यक्त केली. एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केलं जात होतं. परंतु सध्या देशात काय घडत आहे? काही लोकांकडू बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत. आपल्या ताकदीचा वापर अत्याचारासाठी करावा की सुरक्षेसाठी करावा, असा सवालही त्यांनी केला. विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे असे प्रकार रोखले जातील, असंही ते म्हणाले.
कोण आहेत भगत सिंग कोश्यारी
भगत सिंग कोश्यारी यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत. आणीबाणीच्या काळात १९७७ मध्ये त्यांनी तुरुंगवारीही भोगली आहे.
उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. २००१-२००२ या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. २००२ ते २००७ या काळात उत्तराखंड विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी त्यांची वर्णी लागली होती. २००८ ते २०१४ या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. ७७ वर्षीय भगत सिंग कोश्यारी यांनी इंग्रजी साहित्य विषयात पदवी संपादन केली आहे. व्यवसायाने ते शिक्षक आणि पत्रकारही होते.
Web Title: Governor of Maharashtra Bhagatsingh Koshyari Teach Sanskrit Shlok To Avoid Rape Cases.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं