उद्धव ठाकरेंनी तो निर्णय का घेतला? शिंदे गटातील नेत्याने केली होती फडणवीसांची पोलखोल, गुलाबराव पाटलांनी थेट मोदींकडे तक्रार केली होती

Gulabrao Patil Video | यावर्षी शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडणार आहे. तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडणार आहे. आपलाच दसरा मेळावा कसा बरोबर आहे हे सांगण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत. आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना त्यांच्याच काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी वक्तव्यांची आठवण करून देत विसर न व्हावा कँपेन सुरू केलं आहे.
नेमकं काय आहे कँपेन :
दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजतले आणि त्यांच्या भाषणातले अंश वापरत एकनाथ शिंदे गटाने आम्ही विचारांचे वारसदार हे वाक्य निवडलं आहे. याच अनुषंगाने सोशल मीडियावर विसर न व्हावा हे कँपेन सुरू करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातच अजित पवार, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती हे सांगणारी ही वक्तव्यं आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ही सगळी वक्तव्यं ट्विट केली आहेत. ही वक्तव्यं उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचीच आहेत. ती क्लिप चालल्यानंतर पुढे विसर न व्हावा या ओळी येतात आणि निष्ठा विचारांशी आणि लाचारांशी नाही असंही वाक्य दिसतं.
मात्र आता शिंदे गटातील नेत्यांची देखील पोलखोल होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप कशाप्रकारे शिवसेनेला संपवत होती याचा पाढा वाचताना थेट नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि त्या देखील सध्याच्या शिंदे गटातील नेत्याकडून. शिंदे गटातील विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. त्यामध्ये त्यांनी भाजपच्या शिवसेना विरोधी राजकारणाची संपूर्ण पोलखोल केल्याचं दिसतंय. तसेच याची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली होती असं देखील स्वतः गुलाबराव पाटील ऑन कॅमेरा सांगत आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी तो निर्णय का घेतला हे देखील गुलाबराव पाटील सांगताना दिसत आहेत.
नेमका व्हिडिओ काय?
भाजपा ने शिवसेने सोबत कशी बेईमानी केली हे सांगताना गुलाबराव पाटील…! pic.twitter.com/pNwm8G8wkU
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) October 1, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gulabrao Patil video trending on social media over BJP political plan check details 02 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं