मला कोअर कमिटीतून मुक्त करा: पंकजा मुंडे

परळी: ‘माझ्यावर पदासाठी दबावाचा आरोप केला जात असेल तर मी आता भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य नाही, भारतीय जनता पक्ष कोअर कमिटीच्या जबाबदारीतून चंद्रकातदादा मी मुक्ती मागत आहे,’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील दुख:ला वाट मोकळी करून दिली आहे.
मी कुणाकडेही काही मागणी करणार नाही, माझी कोणाकडून काही अपेक्षा नाही. काही जण म्हणतात, पंकजा मुंडे दबावाचं राजकारण खेळत आहेत, प्रदेशाध्यक्षपद, विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी दबाव आणू पाहत आहेत, पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलेलं आहे.
१ डिसेंबरपूर्वी दररोज टीव्हीवर संजय राऊत दिसायचे. परंतु त्यानंतर सर्वत्र फक्त पंकजा मुंडे दिसू लागली, केवळ माझ्याबाबतची चर्चा सुरू आहे, नाथाभाऊ म्हणाले तसं आम्हाला ढकलत ढकलत दारापर्यंत आणलं, मी पक्ष सोडण्याच्या वावड्या का उठल्या? मी उत्तर देणार नाही, पक्ष उत्तर देईल, पराभवाने खचणारी मी नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनीही स्वपक्षीयांनाच घरचा आहेर दिला आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना पक्षात मोठं केले. पण त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या रक्तात बेईमानी नसल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. मला भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. मी पक्ष सोडणार नाही, हवं तर पक्षाने मला सोडावं असं आव्हान भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला देत आपल्या राज्यातील दौऱ्याची घोषणा पंकजा यांनी केली.
Web Title: I am not a Core Committee Member of BJP Now says Pankaja Munde
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं