काँग्रेसचा एकही आमदार पक्ष सोडायचे धाडस करणार नाही...आणि केल्यास

मुंबई: आमचा कोणताही आमदार पक्ष सोडायचे धाडस करणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती वाटते का, असा प्रश्न विचारण्यात आला.
त्याला उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, आमदार फुटतील अशी भीती आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, राज्यातील जनमत हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे कोणताही आमदार फुटण्याचे धाडस करणार नाही. यानंतरही कोणी तशी हिंमत केलीच तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिघेजण मिळून त्या आमदाराचा पराभव करतील, असा सज्जड इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.
आतापर्यंत भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापन करायला हवी होती, पण असं होताना दिसत नाही आहे. कारण भारतीय जनता पक्षा आपल्या मित्रांना सांभाळू शकत नाही, याला जबाबदार भारतीय जनता पक्षाच आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. जर भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा किंवा अध्यक्षांचा पराभव झाल्यास तो सरकारचा पराभव समजला जातो, असं म्हणत विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून थोरातांनी भारतीय जनता पक्षाला सूचक इशारा दिला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान असून, काळजीवाहू सरकारनं जनतेची काळजी घ्यावी, असा सल्ला थोरातांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निकालच्या १२ दिवसानंतरही सुटलेला नाही. शिवसेनेने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर शिवसेनेने चर्चेची दारं बंद केल्याने भाजपानेही वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जर सरकार स्थापनेचा दावा भाजपाने केला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं