12 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा | 10 दिवसांत अंतर्गत मूल्यांकन योजना बनवा - सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली, २४ जून | सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी केली. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना 31 जूलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच 10 दिवसांत अंर्तगत मूल्यांकन योजना तयार करण्यासदेखील सांगितले आहे.
सर्व राज्य मंडळासाठी मूल्यांकन योजना एकसारखी तयार करण्याच्या आदेशाला मंजूरी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. न्यायालयाचे म्हणणे होते की, हा निर्णय घेण्यासाठी राज्ये आणि त्यांचे बोर्ड स्वतंत्र व स्वायत्त आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करणार नसल्याचे न्यायालयाने यापूर्वी सांगितले होते.
याचिकेत कोणती मागणी केली होती?
राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका अॅड. अनुभा सहाय श्रीवास्तव दाखल यांनी केली होती. दरम्यान, ही याचिका सर्वोच्च न्यायालयात बराच काळ प्रलंबित होती. यावेळी अनेक राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता तर सहा राज्यांत यापूर्वीच 12 वीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. फक्त आंध्र प्रदेश राज्याचा निर्णय बाकी होता. अशा परिस्थितीत याचिकाकर्त्याने कोर्टाकडे अशी मागणी केली की, सर्व परीक्षा रद्द करून मूल्यांकनाची एकसमान योजना तयार करण्याबाबत आदेश जारी करावा.
CBSE चा फॉर्मूला:
10 वीच्या पाच विषयांमध्ये ज्या 3 मध्ये विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त स्कोअर केला असेल, तेच विषय रिझल्ट तयार करण्यासाठी निवडले जातील.
11 वीचे पाच विषय आणि 12 वीच्या यूनिट, टर्म किंवा प्रॅक्टिकलमध्ये मिळालेल्या अंकांना रिझल्टचा आधार बनवले जाईल.
10 वी आणि 11 वीच्या गुणांना 30-30% आणि 12 वीच्या गुणांना 40% वेटेज दिले जाईल.
जे मुलं परीक्षा देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी परिस्थिती सामान्य झाल्यावर वेगळ्या परीक्षेची व्यवस्था केली जाईल.
सरकारचे तर्क- तज्ञ समितीसोबत डिझाइन केला फॉर्म्युला:
अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी सांगितले की 1929 पासून सीबीएसई आपल्या सेवा पुरवत आहे. इतिहासात याआधी असे कधी झाले नव्हते. आम्ही तज्ञ समितीसमवेत हे सूत्र तयार केले आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा व विषय 11 वी व 12 वीपेक्षा वेगळे आहेत, म्हणून आम्ही मागील 3 वर्षे दहावी, अकरावी आणि बारावीला आधार बनवले आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Important order of Supreme court on 12th Standard result 2021 news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं