वर्धा: त्या आरोपीला सुद्धा जाळून टाका, न्याय द्या; स्थानिकांची घोषणाबाजी

वर्धा: नंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना काल घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती, ती काल नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले आणि त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.
त्यानंतर एकतर्फी प्रेमातून एका तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याच्या धक्कादायक घटनेनंतर हिंगणघाट शहरात जनआक्रोश गगनाला भिडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अवघे हिंगणघाट शहरच निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसले. गुन्हेगाराला ताबडतोब फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीचे फलक घेऊन विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पुरुष, कामगार, डॉक्टर्स, वकील, व्यापारी वर्ग व अन्य संघटनांनी मोर्चा काढला.
तत्पूर्वी, जेथे ही घटना घडली त्या नंदोरी चौकातून निघून हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे गेला. या मोर्चाला गावातल्या लहान लहान भागातून निघालेले छोटे मोर्चे सामील होताना दिसत होते. येथे मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आरोपीला जाळून टाका, न्याय द्या, सुरक्षा हवी अशा आशयाचे फलक व घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. समुद्रपूरमध्येही अशाच प्रकारचा मोठा मोर्चा काढण्यात आला.
तिला रुग्णालयात दाखल केलं. ही तरुणी ४० टक्के भाजली आहे. तिची वाचा गेली आहे. श्वास घेण्यासही तिला त्रास होतो आहे. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तिला नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची दृष्टीही जाण्याची भीती आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Web Title: In Vidarbha Wardha Hinganghat shut down professorship fire city local peoples was just down road.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं