प्लॅस्टिक बंदीमध्ये फ्लेक्सचा समावेश करावा, नेटकऱ्यांची मागणी - सोशल व्हायरल

शिवसेनेचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मागीलवर्षी प्लॅस्टिकबंदी जाहीर केली होती. ह्या प्लॅस्टिकबंदीचा त्रास सर्वच स्थरातील लोकांना झाला, कारण पर्याय उपलब्ध न करता केलेली हि प्लॅस्टिकबंदी होती. प्लॅस्टिकबंदीवर दंड हि ५०००/- रुपयांचा होता म्हणूनच काही प्रमाणात हि प्लास्टिकबंदी यशस्वी देखील झाली. पर्यावरण मंत्र्यांच्या या निर्णयाचे समर्थन कमी पण विरोधच जास्त झाला.
प्लास्टिकबंदीचा हा निर्णय नंतर काही प्रमाणात शिथिल देखील करण्यात आला. परंतु सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न म्हणजे जर प्लॅस्टिकची पिशवी बाजारात उपलब्धच नसेल तर कोण कशाला वापरेल? म्हणजे जर प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार करणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई केली तर बाजारात प्लॅस्टिकची थैलीच दिसणार नाही. परंतु प्लॅस्टिकबंदी हि टप्प्याटप्प्याने व्हायला हवी होती जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास झाला नसता. तसेच सरकारने प्लॅस्टिकच्या पिशवीला पर्याय द्यायला हवा होता.
दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली. दुधाची पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट घ्यायचे आणि पिशवी परत दिली की ५० पैसे परत द्यायचे ही योजना सर्व दुध कंपन्यांनी मान्य केली आहे. एका महिन्यात हे सुरू होईल अशी माहिती कदम यांनी विधानसभेत दिली. राज्यात दिवसाला १ कोटी दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्या रस्त्यावर येतात आणि त्यातून ३१ टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होत असल्याचे कदम यांनी सांगितले.
प्लॅस्टिकबंदीवर मात्र नेटकऱ्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महाराष्ट्र सरकारला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांच्या मते प्लॅस्टिकबंदीमध्ये फ्लेक्स बॅनरचा देखील समावेश करावा. आज गल्लोगल्ली आणि रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला फ्लेक्सच – फ्लेक्स दिसतात. कुठे भाऊंचा वाढदिवस, कुठे राजकीय अभिनंदन तर कुठे राजकीय श्रेयाच्या नावाने लागलेले फ्लेक्स. इतकंच काय तर आजकाल लोकांनी लहानग्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स देखील लावायला सुरुवात केली आहे. हे इतरत्र लावलेले फ्लेक्स शहरांच्या सौंदर्यात डाग होताना दिसत आहेत.
अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग्सवर महापालिकेने कारवाई करणे आवश्यक आहे परंतु कारवाई होताना फार कमी दिसते. राजकारण्यांचे आणि अधिकाऱ्यांचे असलेले लागेबांधे यामुळे अधिकारी देखील त्याकडे कानाडोळाच करने पसंत करतात. म्हणूनच कायतर ह्या फ्लेक्सला कंटाळलेल्या नेटकऱ्यांच्या मते प्लॅस्टिकबंदीमध्ये फ्लेक्सचा समावेश झाला पाहिजे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं