भाजप प्रवेशास नकार देताच मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर आयकर विभागाची धाड

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील विरोधकांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर अचानक ईडी तसेच आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. त्यावेळी देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते, साखर तथा शिक्षण सम्राट आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर चाणाक्ष आयकर विभागाने धाडी टाकल्याचे वृत्त आहे. आज सकाळी आयकर विभागाची टीम मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाली. हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यांवर देखील छापा टाकल्याची माहिती मिळत आहे.
एनसीपी’चे विद्यमान आमदार असलेले हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे प्रस्त मानले जातात. त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने नेमक्या कोणत्या कारणास्तव ही छापेमारी केली आहे, याबाबतची माहिती अद्याप प्रसार माध्यमांना समजू शकलेली नाही.
तब्बल १५ जणांचे पथक त्यांच्या घरातील विविध कागदपत्रांची माहिती घेत आहे. एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर प्रचंड गर्दी केल्याचे वृत्त आहे. मुश्रीफ यांच्या घरासह त्यांचा माद्याळ ता. कागल येथील खासगी साखर कारखाना, त्यांच्या पुण्यातील मुलाचे घर व टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्या देखील घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याने खळबळ उडाली.
मागच्या ४ दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्ष प्रदेध्याध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना भारतीय जनता पक्षात प्रवेशाची जाहीर समारंभात ऑफर दिली होती. मात्र त्यांनी त्यास स्पष्ट नकार देऊन शरद पवार हेच आपला देव असल्याचे सांगून कर्नाटकात एकेक आमदाराला खरेदी करण्यासाठी ७० कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने दिले असून, हा पैसा आला कोठून अशी विचारणा केली होती. त्याचा परिणाम म्हणूनच ही कारवाई झाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं